पसायदान

pasaydan

pasayadan 1

 

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या आद्य रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळा ) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाक यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात .........

जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||

ज्या व्यक्ती खळ( वाईट प्रवृत्तीच्या )आहेत त्यांच्यातील खलत्व ( वाईट प्रवृत्ती ) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे तर त्यांची प्रवृत्ती सतप्रवृत्तीत परावर्तीत व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्रा होवोत ! { जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम" ( दुष्टांचा नाश करण्यासाठी )साठी मी जन्म घेतो असे म्हंटले तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद" मागितला}

दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||

वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे , नदीचा प्रवाहित राहणे , त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्म रुपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की , ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल , कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !

Enligsh Translition :-

Now, 'O' God, The entire Cosmos Divine | Be pleased with this pious word offering of mine ||
Grant me in good will benign | Your Benevolent Grace Divine ||1||
May the evil minded, their wickedness shed | May their intellect turn to pious and good deeds instead ||
May all living beings find themselves bonded | By friendly ties of soul companionship ||2||
May the darkness of ignorant disappear | May the universe see the Sun of self consciousness ||
May whatsoever aspirations of those be fulfilled | Of all living beings ||3||
May shower all over the pious bliss Divine | May the world be full of Saintly beings benign ||
May incessantly in the Universe | Meet the living beings ||4||
Moving groves of wish granting trees | Colonies of conscious wish fulfilling jewels ||
These saints are, speaking oceans | Full of pious Nectarly Divine ||5||
A Moon without a smear | A Sun without a hot sear ||
Always to one and all, these hallowed saints | Become kith and kin dear ||6||
Let all beings be completely satisfied and happy | Fully contented in all the three world ||
Engrossed and merged in devotion | Eternally, of ultimate Divine ||7||
And those who live by this scripture Divine | Eternally guiding all living beings ||
Be victorious over seen unforeseen | In this world and beyond ||8||
Here, said, the lord of the Universe | This shall become thy Grace Divine ||
And with this blissful Grace Divine | Jnandeva became ever joyous and happy benign ||9||